ताज्या घडामोडी

जेजुरीवर देव मल्हारी प्रसन्न श्री मार्तंडदेव संस्थानाला मिळाली 23 एकर 19 गुंठे जागा सर्व विश्वस्त यांच्या प्रयत्नांना यश


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा

जेजुरी साठी श्री खंडोबा महाराज प्रसन्न गेल्या कित्येक वर्षापासून जेजुरी गडावर श्री मार्तंड देवस्थान च्या नावाने

फक्त सव्वादोन गुंठे जमीन होती, यामध्ये वनविभाग, पुरातत्व विभाग यांच्या ताब्यात ही जमीन होती आज श्री खंडेरायाच्या आशीर्वादाने व श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी गड

सर्व विश्वस्तांच्या प्रयत्नाने विशेष करून विश्वस्त एडवोकेट पांडुरंग थोरवे यांच्या प्रयत्नातून जेजुरी गड जो फक्त सव्वा

दोन गुंठे जमीन देवसंस्थानच्या मालकीची होती ,तो आजपासून 23 एकर 19 गुंठे म्हणजे जवळजवळ साडेतेवीस एकर म्हणजे 23 एकर 19 गुंठे सर्व श्री

मार्तंडदेव संस्थांनच्या नावे झाला आहे,याकामी जमीन नावावर करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, विश्वस्त, देवाचे मानकरी यांनी विशेष प्रयत्न केले, त्यांचे श्री खंडोबा

देवस्थानच्या विश्वास त्यांनी विशेष अभिनंदन केले असून आज श्री खंडोबा भक्त निवास या ठिकाणी खोबरं भंडारा उधळून फटाके वाजवून स्वागत केले, यावेळी श्री खंडोबा

देवस्थानचे अध्यक्ष अनिल सौंदांडे,विश्वस्त मंगेश घोणे, ऍड पांडुरंग थोरवे,पोपट खोमणे,डॉ राजेंद्र खेडेकर, ऍड विश्वास पानसे,अभिजीत देवकाते उपस्थित होते


Translate »
error: Content is protected !!