पुरंदर मधील विविध समाजसेवकांचा “अजय” मंडळाकडून सत्कार सोहळा संपन्न
मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::
पुरंदरमधील समाजसेवकांचा ‘अजय’ मंडळाकडून सत्कार..
सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक येथील अजय सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत यंदाही सासवड नगरपालिकेच्या आरोग्य, पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. याबरोबरच परीसरातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील संस्था आणि मान्यवरांचाही गौरव करण्यात आला.
शनिवारी (दि. २८) येथील संत नामदेव मंदिरात हा उपक्रम झाला. याप्रसंगी माजी आमदार अशोक टेकवडे, विजय कोलते, भाजपचे शेखर वढणे, राष्ट्रवादीचे वामन जगताप, शिवसेनेचे अभिजीत जगताप, अॅड आण्णा खाडे, अॅड दिलीप निरगुडे, शाम महाजन, अभिजीत बारवकर, मोहन चव्हाण, मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पवार, मोहन शिंदे, राजन जगताप उपस्थित होते. संजय काटकर आणि जालिंदर काळे यांनी सुत्रसंचलन केले.
पुरस्कारार्थी संस्था, व्यक्ती : आचार्य अत्रे प्रतिष्ठान, लक्ष्मी बाल विकास मंदिर, हरिभाऊ लोळे, संजय काटकर, सिद्राम कोळी, रविंद्र गाडेकर, मएसो बाल विकास मंदिर, श्री संत सेवा संघ, कुटूंब प्रबोधन पुरंदर, कुलवंत वाणी ट्रस्ट, कल्पना त्र्यंबक भोंगळे आणि दिलीप लंगडे यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक :
पालखी सोहळ्यानंतर अल्पावधीत शहर स्वच्छ करणाऱ्या पालिका आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजय मंडळाकडून वीस वर्षांहून अधिक काळ गौरव केला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळेच शहरातील आरोग्य सुरक्षित राहत असल्याने, मंडळाकडून भेटवस्तू व भोजन देऊन सन्मानित केले.
चौकट…
माजी आमदार अशोक टेकवडे यांनी अजय मित्र मंडळ आणि प्रवीण पवार यांच्या दिनदुबळ्यांसाठीच्या ५० वर्षांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. “करोडपती व्यक्ती किंवा मोठ्या संस्थांनाही जे जमणार नाही, असं काम हे मंडळ करतंय. त्यांचं हे काम आदर्श आणि कौतुकास्पद आहे,” असं टेकवडे म्हणाले.






