पुणे

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संपर्क दौऱ्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद :


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
उपसंपादक सह्याद्री माझा नवनाथ राणे ::
सोमेश्वर कारखान्याच्या संपर्क दौऱ्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद

सासवड, प्रतिनिधी : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप व संचालक मंडळाने दि. ४ जून २०२६ रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी विविध गावांचा संपर्क दौरा आयोजित केला. या दौऱ्यात मावडी, जवळार्जुन, पांडेश्वर, नाझरे, कोळविहिरे, नावळी, वाळुंज, शिवरी, खळद व सासवड परिसरातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

जवळार्जुन येथे आयोजित बैठकीत बोलताना चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यालाच द्यावा, असे आवाहन केले. सोमेश्वर कारखान्याने ऊसाला सर्वाधिक दर दिलेला असून सभासदांनी इतर कारखान्यांकडे ऊस वळवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जवळार्जुन ग्रामस्थांनी पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर चेअरमन जगताप यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून माहिती घेतली. अधिकाऱ्यांनी तीन ते चार दिवसांत पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली.

तसेच शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवड टाळून दहाव्या महिन्यात ऊस लागवड करावी, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.

या दौऱ्यात कारखान्याचे व्हाइस चेअरमन, संचालक बाळासो कामथे, शांताराम कापरे, भोंडवे साहेब, शेतकी अधिकारी तसेच कारखान्याचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय आण्णासो राणे, सुधाकर टेकवडे, रामभाऊ राणे, महेश राणे, शिवाजी राणे, मामासो गुळूमकर, आप्पासो राणे, राजेंद्र जगताप, दिलीप टेकवडे, मोहन राणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!