ताज्या घडामोडीपुणे

आदर्श क्रांती संघटना आयोजित सामुदायिक सोहळ्यात तीस जोडपी विवाहबद्ध


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा;;

आदर्श क्रांती संघटना आयोजित सामुदायिक सोहळ्यात तीस जोडपी विवाहबद्ध

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी सामुदायिक सोहळ्यात 30 जोडपी विवाहबद्ध सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक

आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने सासवड येथील पुरंदर ज्युनियर कॉलेज येथे, सर्व धर्मीय समाजातील घटकांना सामावून घेऊन, मोफत सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. यामध्ये 30 वधू- वरांचा विवाह संपन्न झाला. वधू-वरांना लग्नाचा पोशाख,

जीवनाविषयी उपयोगी भांडी, बूट, मंगळसूत्र तसेच लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांची भोजनाची व्यवस्था केली होती. सकाळी हळदीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर, सासवड शहरातून वरात काढण्यात आली. परंतु पाऊस हा सतत येत होता, पाऊसाने पुरंदर तालुक्यातील सर्वच ठिकाणी हजेरी लावली होती,

त्यामुळे या समारंभात प्रमुख पाहुणे पाऊसामुळे येऊ शकले नाहीत. तर संघटनेच्या वतीने शासनाच्या शुभमंगल योजनेच्या नियमानुसार संबंधित जोडप्यास 10,000 हजार रुपये दिले आहेत. असे बाळासो भिंताडे यांनी सांगितले. या विवाह सोहळ्यास आमदार बापूसो पठारे, भरत (नाना) शिरसागर, पुरुषोत्तम जगताप, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, जालिंदर कामठे, सुनील चांदेरे,

आदर्श क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय ज्ञा. जगताप, अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, प्राचार्य इस्माईल सय्यद, सुदाम इंगळे, वामन जगताप, बाळासो कामठे, विराज काकडे, पुष्कराज जाधव, दत्ता चव्हाण, एडवोकेट कला फडतरे, नीता सुभागडे, सुशांत भांडवलकर, कैलास जगताप, मनोहर ताथवडकर, बळीराम सोनवणे,

राहुल गिरमे, गणेश मोरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन विकास जगताप, राहुल इनामके, सुनील जगताप, सचिन जगताप, गणेश महाजन, गिरीश कर्नावट, प्रशांत राऊत, उमेश लांडगे, महेंद्र जगताप, नवनाथ बोरावके, सचिन भोंडे, मुन्ना तांबोळी, चंद्रकांत गिरमे,संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन केले होते.


Translate »
error: Content is protected !!