गुरुकुल विद्यालयात पालखी सोहळा उत्साहात साजरा
मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक ::
गुरुकुल विद्यालयात पालखी सोहळा उत्साहात साजरा
सासवड प्रतिनिधी: अप्पू मुळीक – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित गुरुकुल पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सासवड या विद्यालयात आज दिनांक 5 जुलै 2025 वार- शनिवार रोजी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास माननीय सचिन सोनवणे (युवा उद्योजक) प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्यही उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक हाके सर व प्राथमिक विभागाच्या प्र.मुख्याध्यापिका मा. श्रीम.फडतरे मॅडम यांनी केले.
सर्व विद्यार्थ्यांनी अभंगाचे सादरीकरण केले. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्याने श्रीमद्भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठण केले. तसेच प्रशालेतील सहशिक्षिका रूपाली गायकवाड मॅडम व विद्यार्थिनी अनुष्का गळंगे यांनी चक्री प्रवचन सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पावल्या खेळत हरिनामाचा गजर केला. सचिन सोनवणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पालखीच्या शुभेच्छा दिल्या. विठ्ठल माझ्या अंगणी हा वृक्षारोपणचा उपक्रम राबविण्याचे आव्हान केले. यानंतर विठ्ठल नामाचा गजर करत विद्यार्थ्यांनी नगर प्रदक्षिणा केली व पालखी मैदान येथे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून या कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका श्रीमती घारे मॅडम यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.






