ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

3810 मीटर उंचीचा उत्तराखंड मधील अवघड” केदार कंठा” शिखर डॉ लहू कदम, प्रा दीपक जांभळे आणि टीम कडून तीन दिवसात सर


सह्याद्री माझा पुरंदर प्रतिनिधी नवनाथ राणे :::
3810 मीटर उंचीचा उत्तराखंड मधील अवघड” केदार कंठा” शिखर डॉ लहू कदम, प्रा दीपक जांभळे आणि टीम कडून तीन दिवसात सर

उत्तराखंड मधील अवघड “केदार कंठा” शिखर सासवड शहर ता 7 : उत्तराखंड मधील अवघड “केदार कंठा” शिखर १२५०० फूट (3810 मीटर) उंच आहे. तेथील प्रतिकूल हवामान,पाऊस, बर्फ आणि उंचीवर असणारा ऑक्सिजनची कमी यांचा सामना करत इंदापूर

येथील बालरोग तज्ञ डॉ. लहू कदम (वय 64) आणि माजी जिल्हा समादेशक होमगार्ड ,पुणे प्रा. दीपक जांभळे ( वय 62) यांनी तीन दिवसात” केदारकंठा” शिखर सर केले. केदारकंठा हा 40

कि.मी. असून तीन दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केला. द सर्चिंग सोल या ट्रेकिंग कंपनी बरोबर भारतातून आलेल्या पंचवीस ट्रेकसने सांक्री ( उत्तराखंड) जुडा का तालाब, केदार कंठा बेस कॅम्प, हर गाव कॅम्प, मार्गे तेथील बर्फवृष्टी, खराब हवामान आणि ऑक्सिजनची

कमतरता यांचा सामना करत तिसऱ्या दिवशी 12500 फुट (3810 मीटर) उंचीवरील केदारकंठा हे अवघड शिखर सर केले. डॉ. लहू कदम यांनी यापूर्वी देव टिभा, हरकी धून, कुणवारी पास, एवरेस्ट बेस कॅम्प, काश्मीर ग्रेट लेक,आणि महाराष्ट्रातील जवळपास सर्व

किल्ल्यांवर ट्रेकिंग केले आहे. प्रा. दीपक जांभळे हे उत्कृष्ट सायकलिस्ट आणि ट्रॅकर असून त्यांनी गडवाल ट्रेक, शिलाँग ट्रेक, कुल्लू मनाली ट्रॅक, केरळ ट्रेक, जंजिला(हिमाचल प्रदेश) शिकारी देवी, बुढाकेदार, काश्मीर ग्रेट लेक ट्रेक आणि महाराष्ट्रातील

कळसुबाई, नागफणी, वासोटा, हरिश्चंद्रगड पन्हाळगड ते विशाळगड, रायगड, राजगड ते तोरणा गड हे किल्ले सर केले आहेत. याशिवाय सायकल वरून वाघा बॉर्डर, कन्याकुमारी, हम्पी ,उज्जैन असा 25000 किलोमीटर सायकलिंग केले आहे. डॉ.लहू कदम इंदापूर

आणि प्रा. दीपक जांभळे सासवड . दोघेही वयाच्या साठी नंतर ट्रेकिंग आणि सायकलिंग करत आहे. डॉ. लहू कदम ट्रेकिंग बाबत आपला अनुभव सांगताना “महिन्यातून एका गड किल्ले दुर्ग वारी करा रोग आणि आजारातून बाहेर पडा” दुर्ग सर करणाऱ्यांना श्वसन,

रक्तप्रवाह, गुडघे, छाती, पोट आणि मानसिक आजार होणार नाहीत. ट्रेक करणे म्हणजे हृदय आणि फुफुसाचे कार्य अधिक कार्यक्षम करणे होय, गडावरील मनाला प्रसन्न करणारे वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळे मन आनंदी आणि उत्साही राहते. फोटो : “केदार कंठा “शिखर सर प्रसंगी डॉ. लहू कदम प्रा .दीपक जांभळे


Translate »
error: Content is protected !!