आप पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय कड यांची निवड
मुख्य संपादक हनुमंत वाबळे सह्याद्री माझा::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::
आपच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय कड यांची निवड
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक — आम आदमी पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी (दक्षिण विभाग) दत्तात्रय मल्हारी कड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या वरीष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दत्तात्रय कड हे पक्षाचे निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते असून,गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक व राजकीय कार्यात त्यांचे सक्रिय योगदान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील संघटन अधिक बळकट होईल असा पक्षश्रेष्ठींना विश्वास आहे.
निवडीबद्दल कड यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून,जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याची ग्वाही दिली आहे.
या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी व स्थानिक नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.






