पायी वारी पंढरीची आणि आषाढी एकादशीच्या अनुषंगाने भिवरी जि. प. प्राथमिक शाळेमध्ये बालचमुंच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन एस पी दळवी
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::
पायी वारी पंढरी ची आणि आषाढी एकादशी च्या अनुषंगाने भिवरी च्या जि.प.प्राथमिक शाळेमध्ये बालबचुच्यां दिंडी सोहळ्याचे आयोजन
एस.पी.दळवी
सासवड पतिनिधी: पालखी सोहळा म्हणजे काय,आषाढी एकादशी का करावी,आणि पायी वारी कशी असते या विषयी विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे म्हणून भिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने
चिमुकली पायी वारी आणि पालखी सोहळा सादर केला.
शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास रहाणे, उपशिक्षिका सुहासिनी चव्हाण,शितल टापरे,रेश्मा पोमण
व्यवस्थापन संस्थेच्या सदस्या अर्चना गुरव, किर्ती गोफणे,उर्मिला कटके यांनी हा सोहळा परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यात आला.
पालकांनी आपल्या मुलांना विविध संताचे,जनाबाई,मुक्ताबाई,विठ्ठल रुक्मिणी,पताकाधारी,तुळशी,हंडा,मृदुंगमणी,टाळकरी,आणि पालखी व तिचे भोई.असा विविध पोशाख चढवून शिक्षकांना मदत केली.
प्राथमिक शाळेपासून सुरू झालेला दिंडी सोहळा ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत करत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विसावला.मंदिरात आरती करून विद्यार्थ्यांनी झिम्मा फुगडी चा आनंद घेतल्यानंतर ग्रामपंचायत आणि ग्राम प्रदक्षिणा करून परत शाळेमध्ये विसावला.
नंतर महाप्रसाद वाटून दिंडी सोहळ्याची सांगता झाली.






