सासवड नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण यांचा सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न
मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::
मोहन चव्हाण यांचा सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न
सासवड प्रतिनिधी ( बापू मुळीक) ;सासवडची आरोग्यविषयक शिस्त कायम ठेवणार :माजी आमदार संजय जगताप सासवड प्रतिनिधी: गेली अनेक वर्ष सासवड नगरपालिकेच्या स्वच्छता बाबत अग्रभागी असणारे, राज्य पातळीवर तसेच देश पातळीवर स्वच्छतेची ,अनेक मानांकने प्राप्त झाली आहेत, दोन वेळा महा महिम राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारही मिळाले आहेत.
यात आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण यांचा खूप मोठा वाटा आहे, त्यांनी घालून दिलेली आरोग्य विभागाची शिस्त नगरपालिका व सासवडकर नागरिक यापुढे कायम राखतील असे मत माजी आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केले आहे. सासवड नगरपालिका आरोग्य अधिकारी म्हणून या सेवानिवृत्ती कार्यक्रमात जगताप बोलत होते. आणि पालिका मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, नगरपालिका कर्मचारी संघटनेचे नेते ज्ञानोबा घोणे याप्रसंगी उपस्थित होते.
मोहन चव्हाण यांच्या विषयी अनेक प्रकारच्या गोष्टी सांगत जगताप यांनी त्यांचा विठ्ठल मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वच्छतेचे प्रणेते, समर्थ गाडगेबाबा व सरस्वती पूजन करण्यात आले.
न्यानोबा घोणे, कैलास चव्हाण,निखिल मोरे यासह कलाताई फडतरे, यशवंत काका जगताप, प्राध्यापक शिवाजी ढगे, सुधीर गुरव, संकेत नंदावंशी, चव्हाण यांच्या पत्नी माया चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून मोहन चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला, चव्हाण यांच्या कार्यकर्तुत्वाची ध्वनी चित्रफिती प्रदर्शन, त्यांच्याविषयी लिहिलेल्या आरोग्य सेतू या गौरव अंकाचे प्रकाशन, शहर पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेले मानपत्र व विविध संघटना मित्रपरिवार व नातेवाईक यांच्या शुभेच्छानी कार्यक्रम उत्तम पार पडला.
हेमंत ताकवले यांनी सूत्रसंचालन केले. माऊली गिरमे यांनी प्रास्ताविक, किशोरी पवार यांनी सन्मानपत्र वाचन, तर संजय पवार यांनी आभार प्रदर्शन केले. जीवन कड, बाळासाहेब कुलकर्णी, शुभम चव्हाण, जगदीश शिंदे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. माजी नगराध्यक्ष हेमंत भोगळे, दत्ता नाना जगताप, वामन जगताप, एडवोकेट दिलीप निरगुडे,
एडवोकेट आण्णा खाडे, संतोष जगताप, कुंडलिक मेमाणे, नंदकुमार सागर, वसंत ताकवले, संदीप टिळेकर, जगदीश शेवते, डॉ. विनायक बांदेकर, डॉ. दिलीप वाघोलीकर, सदानंद शेट्टी, मंगल म्हेत्रे, विजय वढणे, अजित जगताप, सुहास लांडगे, एडवोकेट अशपाक बागवान, एडवोकेट भारती शिंदे, अनिल उरवणे, सीमा भोंगळे, डॉ. राजेश दळवी, संजय काटकर, शरद बोबडे, भालचंद्र बुधकर, राजाराम यादव, शरद चौरे, मोमीन बागवान, संतोष खोपडे यास अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित लावली. मुख्य कार्यक्रमानंतर अनेक संघटनांनी, मित्र परिवारांनी चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.






