ब्रेकिंग न्यूज

पुरंदरच्या पूर्व पट्ट्यामध्ये पिसे गावात वीज पडून सहा बकऱ्यांचा मृत्यू ; मुलाचा जीव थोडक्यात बचावला


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:
उपसंपादक प्रा संदीप टिळेकर :
पिसे गावात वीज पडून सहा बकरी शेळ्यांचा मृत्यू ; मुलाचा जीव थोडक्यात बचावला

पिसे, दि. २२ सप्टेंबर २०२६ : पिसे गावात मंगळवारी (दि. २२) सायंकाळी सुमारे ५ ते ५.१५ वाजण्याच्या दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असताना अचानक जोरदार विजेचा कडकडाट झाला. यावेळी मोहनदादा मुळीक यांच्या शेतात बकऱ्या चारत असलेल्या श्री. म्हातारो सोनबा ठोंबरे यांच्या बकऱ्यांवर वीज कोसळली.

या दुर्दैवी घटनेत ठोंबरे यांच्या सहा बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या मुलाचाही जीव धोक्यात आला होता; मात्र तो सुदैवाने थोडक्यात बचावला.

आधीच दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या ठोंबरे कुटुंबावर या घटनेमुळे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. बकऱ्या हा त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार असल्याने झालेल्या नुकसानीमुळे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या घटनेची शासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामा करावा आणि संबंधित शेतकरी/पशुपालकास शासकीय नियमानुसार योग्य ती नुकसानभरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी समस्त ग्रामस्थ पिसे यांच्या वतीने करण्यात आली आहे.


Translate »
error: Content is protected !!