साठ टक्क्याहून अधिक शेतकरी प्रस्तावित विमानतळासाठी जमीन देण्यास तयार, पुरंदरच्या हरकतीवर लवकरच सुनावणी होणार
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा::
60 टक्क्याहून अधिक शेतकरी जमीन देण्यास तयार पुरंदरच्या हरकतीवर लवकरच सुनावणी होणार
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादनाला विरोध म्हणून सात गावातील शेतकऱ्यांच्या हरकतीचा पाऊस पडला असला, तरी सहमती देणाऱ्यांची संख्या सुमारे 60% हून अधिक आहे.
विमानतळाचे अधिसूचना जारी होण्यापूर्वी, या सातही गावांमधील सुमारे 60 टक्के जमिनीची विक्री झाली होती, या सर्व शेतकऱ्यांनी यापूर्वी जमीन देण्याची संमती दर्शवली असून, राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या पॅकेजमुळे आणखी शेतकऱ्यांची जमीन देण्यासाठी सहमती दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे,
विमानतळासाठी पारगाव, कुंभारवळण, वनपुरी, एखतपुर, मुंजवडी, खानवडी आणि उदाचीवाडी या सात गावांमधून 2,673 हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. त्यानुसार भूसंपादनाच्या 32 /2 या नोटिसा जारी करण्यात आल्या.त्या नोटीसा नंतर हरकती नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एका महिन्याची मुदत दिली होती,
त्यानुसार 23 मे पासून शेतकऱ्यांनी हरकती नोंदवण्यास सुरुवात केली. सात गावांमधून 30 मे अखेर 2,052 हरकती मुदतीत नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पारगाव गावांमधून 747 इतक्या सर्वाधिक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.
पुढील आठवड्यात या हरकतीवर सुनावणी होणार आहे. दरम्यान, जमीन देण्यास सहमती देणारे पत्रही जिल्हा प्रशासनाकडे येत आहेत, असे सांगितले जात आहे. भूसंपादनाचा मोबदला चांगला मिळण्याची आशा,समती देणारे ची संख्या आता वाढत असून, विमानतळाबाबत हे सकारात्मक पाऊल पडत असल्याचा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. विमानतळासाठी जमीन देण्यासाठी आत्तापर्यंत सुमारे 70% शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली असल्याचे सूत्रांची म्हणणे आहे.
विमानतळाचे अधिसूचना जारी होण्यापूर्वी, सुमारे 60 जमिनींची विक्री झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते, या सर्व शेतकऱ्यांनी जमीन देण्यास सहमती दिली आहे. या जमिनीचे संपादन करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे,
अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन आठवड्यापूर्वी सांगितले होते. त्यानंतर भूसंपादनाचा मोबदला चांगला मिळेल, या आशेवर अनेक शेतकरी जमीन देण्यासाठी तयार होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.






