ब्रेकिंग न्यूज

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहा ब नंबर गटात हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी सुरू


मुख्य संपादक हनुमंत वाबळे-
उपसंपादक नवनाथ राणे

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहा-ब नंबर गटात हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी सुरू

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहा-ब नंबर गटामध्ये सध्या हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस तोडणी सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तुटत असून पाचट कुट्टीही योग्य पद्धतीने होत आहे. दिवसेंदिवस ऊसतोड कामगारांच्या टोळ्या कमी होत चालल्या आहेत, उन्हाची तीव्रता वाढत आहे तसेच ऊस क्षेत्रात मोठी वाढ झालेली असल्यामुळे आधुनिक पद्धतीने मशीनद्वारे ऊस तोडणी करणे काळाची गरज बनली आहे.

याच पार्श्वभूमीवर कारखाना प्रशासन व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप हे सातत्याने शेतकऱ्यांना मशीनद्वारे ऊस तोडणी करण्याचे आवाहन करीत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी साडेचार फुटी सरी काढून त्यामध्ये ऊस लागवड करावी, जेणेकरून हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी सुलभ होईल, असे आवाहन करण्यात येत आहे.

या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी कारखाना प्रशासनाने चिटबॉय यांच्याकडे सोपवली आहे. नाझरे व जवळार्जुन या गावांमध्ये सध्या मशीनद्वारे ऊस तोडणी सुरू असून, ऊस तोडणी सुरू असलेल्या क्षेत्रांना भेट देण्यासाठी अनेक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी नामदेव राणे, संदीप टेकवडे, नागेश टेकवडे, सचिन राणे, मशीन मालक कांबळे, भूषण सोडमीसे, अंकुश टेकवडे, चिटबॉय विजय शितोळे, कालिदास टेकवडे आदी शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना मशीनद्वारे ऊस तोडणी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच हार्वेस्टर मशीनची माहिती देण्यात आली.


Translate »
error: Content is protected !!