राष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल स्पर्धेची नियोजन बैठक संपन्न
मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::
पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा 2025 नियोजन सभा उत्साहात पार
पुणे, ७ जुलै:
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने आयोजित “पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा 2025” च्या नियोजन सभेचे आयोजन वाघिरे महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.
या सभेला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव मा. संदीपजी कदम, खजिनदार मा. मोहनरावजी देशमुख, क्रीडा अधिकारी मा. श्याम भोसले, मा. विवेक यंदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्रा. डॉ. दिगंबरजी दुर्गाडे, माजी आमदार मा. संभाजीराव कुंजीर, मा. वामन तात्या जगताप, मा. गणेश जगताप, श्री. बंडू काका जगताप, फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मा. संदीपजी कदम, प्रा. डॉ. दिगंबरजी दुर्गाडे व मा. दत्ताआबा चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन प्रा. नितीन लगडे यांनी तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. संजय झगडे यांनी केले.
—






