ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोमवती अमावस्या निमित्त वीर मध्ये भाविकांची गर्दीच गर्दी, यानिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा दिनदर्शिकेचे लोकार्पण सोहळा संपन्न


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
सोमवती अमावस्यानिमित्त श्री क्षेत्र वीर येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी
श्रीनाथ म्हस्कोबा दिनदर्शिकेचे पूजन व लोकार्पण संपन्न

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या काशीखंडाच्या काळभैरवाचे अवतार श्रीनाथ म्हस्कोबा व आई जोगेश्वरी, श्रीक्षेत्र वीर देवस्थान येथे सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळाली.

पहाटे ४ वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. भाविकांची गर्दी पाहता व पहाटे ४ वाजेपासूनच देऊळवाडा दर्शनासाठी खुला करण्याचा निर्णय मंदिर प्रशासने घेतला त्यामुळे पहाटे येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश करून दर्शन घेता आले. त्यानंतर सकाळी ६ वाजता मुख्य

गाभाराही दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासूनच देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी दहा वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. दुपारी ११.३० वाजता दुपारी होऊन

श्रीनाथांची पालखी सर्व लवाजम्यासहित निरास्नानासाठी श्रीक्षेत्र घोडेउड्डाण येथे निघाली. यासंबंधी पूर्व नियोजन संपूर्ण विश्वस्त मंडळांनी केल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. राजेंद्र धुमाळ यांनी सांगितले.
मंदिरात दिवसभर आजचे महाप्रसादाचे आयोजन श्री. सदाबापू धोंडीबा सातव, बारामती व कै. शंकरराव वामनराव धुमाळ यांच्या स्मरणार्थ करण्यात आले होते. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, लाईट व जनरेटर, दर्शनबारी, वाहनतळ व्यवस्था, परिसर स्वच्छता, ज्यादा कर्मचारी स्वयंसेवक, ट्रॅफिक पोलीस यांचे आयोजन करण्यात आले होते.
देवस्थान ट्रस्ट मार्फत आज श्रीनाथ म्हस्कोबा दिनदर्शिका लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. भाविकांना मोफत दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. सर्व सालकरी, मानकरी,विश्वस्त, सल्लागार मंडळ, ग्रामस्थ भाविक आदीजन यावेळी उपस्थित होते
यावेळी व्हाईस चेअरमन अमोल धुमाळ, विश्वस्त सुनील धुमाळ, सचिव काशिनाथ धुमाळ, विराज धुमाळ, खजिनदार अमोल धुमाळ, बाळासाहेब समगीर, श्रीकांत थिटे, जयवंत सोनवणे, सौ.प्रमिला देशमुख सौ.अलका जाधव आदींनी व्यवस्था पहिली.


Translate »
error: Content is protected !!