खड्ड्यामुळे होणाऱ्या त्रासा पोटी येवलेवाडीत खड्ड्यातच केले वृक्षारोपण – जालिंदर भाऊ कामठे
सह्याद्री माझा प्रतिनिधी
येवलेवाडी परिसरातील व कोंढवा सासवड रोड बोपदेव घाट मार्गे प्रवास करणाऱ्या नागरिकांना रोज येवलेवाडी परिसरात पडलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा निषेध करण्यासाठी
आज शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालींदर कामठे यांच्या नेतृत्वात येवलेवाडी येथे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन करण्यात आले आंदोलन प्रसंगी बोलताना जालींदर कामठे यांनी येवलेवाडी परिसरात मोठी महाविद्यालये शाळा आहेत पुरंदर तालुक्यातील बरेचसा शेतकरी वर्ग घाटाचा
वाहतुकीसाठी वापर करत आहे. रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. सदरच्या रस्त्यावर अपघात घडून काही घटना घडल्यास सार्वजनिक बांधकाम खाते विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा जालींदर कामठे यांनी दिला
सामान्य नागरिकांच्या यातनांकडे लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने तातडीने आठ दिवसात सदरील रस्त्यांची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी करण्यात आली सदर प्रसंगी संदीपदादा धांडेकर दादासाहेब कामठे मा. उपसरपंच राजू पठाण राहुल कामठे पंकज पाटील सचिन निंबाळकर तसेच येवलेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते






