राजकीय

“एक विद्यार्थी – एक वृक्ष”उपक्रमा अंतर्गत 66 हजार लक्ष्मी तरु वृक्षांची लागवड – नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::

“एक विद्यार्थी – एक वृक्ष” उपक्रमांतर्गत 66 हजार लक्ष्मी तरु वृक्षांची लागवड – अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम

पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त 66 हजार लक्ष्मी तरु वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शाश्वत विकास फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अजित वृक्ष योग आरोग्य महोत्सव 2025’ हा उपक्रम पुणे जिल्हा ग्रामीण भागात राबवण्यात येत आहे.

या उपक्रमाअंतर्गत ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ ही मोहिम संपूर्ण जिल्ह्यात राबवली जाणार असून, शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जाणीव निर्माण करणे, तसेच योग आणि आरोग्याविषयी आवड वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

लक्ष्मी तरु या औषधी वृक्षाची लागवड या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार असून, या वृक्षाच्या अनेक औषधी गुणधर्मांमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होऊ शकतो, असेही यावेळी सांगण्यात आले.

या उपक्रमाची माहिती महाराष्ट्र राज्य वृक्ष लागवड व संगोपन समन्वयक तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक श्री. प्रभाकर जगताप यांनी दिली. त्यांनी सांगितले की, “या वर्षीच्या उपक्रमाची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनेत्राताई पवार यांना लक्ष्मी तरु वृक्ष भेट देऊन करण्यात आली. दोघांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. पुढील वर्षी हा उपक्रम वाढवून ११ लाख लक्ष्मी तरु वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात येणार आहे.”


Translate »
error: Content is protected !!