मुख्यमंत्री सहाय्यता आणि निधीसाठी पुरंदर हवेली चे आमदार विजय शिवतारे यांच्याकडून एक लाख 11 हजार 1111 रुपयांची मदत
मुख्य संपादक हनुमंत वाबळे सह्याद्री माझा::
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पुरंदर-हवेली मतदारसंघाकडून ₹१,११,१११ ची मदत!
मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बॅनर, पोस्टर आणि जाहिरातींवरील अनावश्यक खर्च टाळून, त्याऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान द्यावे असे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत, माझ्या वतीने ₹१,११,१११ (एक लाख अकरा हजार एकशे अकरा) रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला आहे.
या माध्यमातून गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या उपचारासाठी हा निधी उपयोगी पडेल, तसेच रुग्णसेवेसाठी थोडासा हातभार लागेल, अशी आशा आहे.
मुख्यमंत्री साहेबांचे नेतृत्व सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श आहे. त्यांच्या प्रत्येक आवाहनाला कृतीत उतरवण्याच्या माझ्या छोट्याशा प्रयत्नातून ही मदत समर्पित करत आहे.
ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🎉






