क्राईम न्यूजब्रेकिंग न्यूज

अनाथ मुलींची लग्नाच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या टोळी विरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा; पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या नावे बोगस अकाउंट


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा::

अनाथ मुलींशी लग्नाच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या टोळी विरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा; पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावे बोगस अकाउंट

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने खोटे अकाउंट उघडून, अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळून, जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करून, जनतेची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीवर कठोर आणि दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत ममता बाल सदन आश्रम येथील लिपिक संजय शामराव गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

मागील काही दिवसापासून पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने अनाथ मुलींचा आश्रम असल्याची बतावणी करून, अनाथ मुलींशी लग्न लावून दिले जाईल, त्यासाठी 15 ते 20 हजार रुपयांची मागणी करण्यात येत असल्याच्या, तक्रारी फोनवरून आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. लग्नासाठी संपर्क साधण्यासाठी 84 32 52 72 07 आणि 94 23 81 75 23 हे दोन नंबर दिलेले आहेत.

वरील दोन्ही नंबर तपासले असता हा नंबर सिंधुताई सपकाळ अहिल्यानगर, आश्रम नावाने असल्याचे दिसून येते. आश्रमात यायच्या आधी फी भरून रजिस्ट्रेशन करणे, आवश्यक असल्याचे सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर पास दाखवल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही,

अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल, असे देखील त्यांनी सोशल मीडियावर दिलेल्या जाहिरातीत म्हटले आहे. ही बाब अतिशय संताप जनक असून, माई पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने सोशल मीडियावर खोटे अकाउंट तयार करून फसवणूक करणाऱ्यावर वेळीच कठोर आणि दंडात्मक कारवाई होणे गरजेचे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


Translate »
error: Content is protected !!