क्राईम न्यूज

मृताची ओळख पटवण्यासाठी सासवड पोलिसांच्या वतीने केले आवाहन


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
पुरंदर प्रतिनिधी समीर भिंगारदिवे
सोनोरी येथे अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला; सासवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

सासवड : पुरंदर तालुक्यातील मौजे सोनोरी गावच्या हद्दीत नवीन जेजुरी रोडवरील ब्रीजलगत सर्व्हिस रोडवर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सासवड पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सोनोरी येथील पोलीस पाटील तथा हॉटेल व्यावसायिक अविनाश राजेंद्र सोनवणे यांना गावातील मयुर ज्ञानेश्वर मोरे यांनी फोन करून नवीन जेजुरी रोडवरील ब्रीजलगत सर्व्हिस रोडवर नागरिकांची गर्दी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता तेथे एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला.

घटनास्थळी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच सासवड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी दाखल झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला मृत घोषित केले.

या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मयत रजिस्टर क्रमांक 52/2026, बीएनएसएस कलम 194 प्रमाणे नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक हिप्परकर करीत आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक कुमार कदम कार्यरत आहेत.


Translate »
error: Content is protected !!