ताज्या घडामोडी

*पुरंदर-हवेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राहुलदादा गिरमे व मित्र परिवाराच्या वतीने* व *अक्षरसृष्टी संस्था,पुणे* यांच्या *माध्यमातून* सासवड मधील *१० गरजू दिव्यांग बांधवांना किराणा किट वाटप*


संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
पुरंदर-हवेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राहुलदादा गिरमे व मित्र परिवाराच्या वतीने व अक्षरसृष्टी संस्था,पुणे, यांच्या माध्यमातून सासवड मधील १० गरजू दिव्यांग बांधवांना किराणा किट वाटप

सासवड : स्व. शिवाजीअप्पा पोमण यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत पुरंदर-हवेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राहुलदादा गिरमे व मित्र परिवार यांच्या वतीने तसेच अक्षरसृष्टी संस्था, पुणे यांच्या माध्यमातून सासवड येथील १० गरजू दिव्यांग बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी १० वाजता स्व. शिवाजीअप्पा पोमण वाचनालय, जयप्रकाश नारायण चौक, सासवड येथे संपन्न झाला.

यावेळी बोलताना राहुलदादा गिरमे यांनी स्व. शिवाजीआप्पा पोमण यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा, असे सांगितले.

कार्यक्रमास मार्केट कमिटीचे उपसभापती ईश्वर बागमार, माजी उपनगराध्यक्ष संजयअण्णा जगताप, ज्येष्ठ पत्रकार दत्तानाना भोंगळे, दिव्यांग बांधवांचे नेते अमोल बनकर, अरुण खेनट, संजय टिळेकर, दत्ता राऊत, नवनाथ बोरावके, सुनिल लोणकर, हनुमंत वाबळे, सतेज पोमण, विजय पोमण, सुनिल जगताप, पुरुषोत्तम जाधव तसेच दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!