पुणे

पिसर्वे – लक्ष्मी माता समाज मंदिराचे उद्घाटन संपन्न


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा-
लक्ष्मी माता समाज मंदिराचे उद्घाटन संपन्न

प्रत्येक गावातील अण्णाभाऊ साठे नगर वस्तीत विकासकामे केल्यामुळे साठे नगर मुख्य प्रवाहात आलेले आहे. “महात्मा गांधीजींच्या विचाराने चाललेल्या भारत देशात जातीभेद गाडून टाकून भविष्यात आपण सर्वांनी एकजुटीने काम करूया,” असे विचार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदामअप्पा इंगळे यांनी व्यक्त केले.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या दहा लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या लक्ष्मी माता समाज मंदिराचे उद्घाटन श्री. इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून –

पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माणिक झेंडे पाटील

निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुशांत कांबळे

शामराव शेंडगे, सरपंच रवींद्रआबा कोलते, उपसरपंच चंद्रकांत कोलते, माजी सरपंच संभाजीदादा कोलते
हे उपस्थित होते.

तसेच पिसर्वे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुरेशशेठ कोलते, विकास कोलते, अरुण कोलते, संतोष सुरेश कोलते, सुनील कोलते, उमेश शेंडगे, अक्षय खरात, महेश खरात, शांताराम दोडके, रवींद्र शेंडगे, विजय दोडके, कॉन्ट्रॅक्टर स्वप्निल निगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर सदस्य साधू मेमाणे यांनी केले.
तर सर्व उपस्थितांचे आभार युवक नेते व उद्योजक गौरव कोलते यांनी मानले.


Translate »
error: Content is protected !!