राजकीय

सासवड नगरपालिका उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून प्रीतम म्हेत्रे यांना उमेदवारी जाहीर


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:
सासवड नगरपालिका उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून प्रीतम म्हेत्रे यांना उमेदवारी जाहीर

सासवड प्रतिनिधी :
नुकत्याच पार पडलेल्या सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नऊ उमेदवार विजयी झाल्यानंतर नगरपरिषदेतील पुढील सत्तास्थापना प्रक्रियेबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

उपनगराध्यक्ष पदासह स्वीकृत नगरसेवक कोण होणार, याकडे सर्वच पक्षांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वतीने उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक प्रीतम म्हेत्रे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सासवड नगरपालिका विरोधी पक्ष गटनेते मंदार गिरमे, सासवड शहर शिवसेना अध्यक्ष मिलिंद इनामके, नगरसेवक वैभव (राजेंद्र) टकले, संदीप जगताप, मंगेश भिंताडे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी अंकुर शिवरकर, सचिन भोंडे यांच्या उपस्थितीत व पाठिंब्याने प्रीतम म्हेत्रे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्याने सासवड नगरपरिषदेतील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवड प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Translate »
error: Content is protected !!