पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणचे शेखर वढणे यांची भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणचे शेखर वढणे भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड
सासवड प्रतिनिधी: सासवड (ता. पुरंदर) येथील शेखर अशोक वढणे (वय 43 )भाजप दक्षिण पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. सामान्य कुटुंबातून आलेल्या वढणे यांच्या त्या निवडीमुळे पुरंदर तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. वढणे यांचे वडील राज्य परिवहन मंडळातून सेवानिवृत्त वाहक आहेत,
तर आई गृहिणी आहे, त्यांच्या पत्नी सोलापूर शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक, आणि बंधू पुणे सीआयडी मध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत, वढणे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण म.ए.सो वाघिरे हायस्कूल सासवड येथे झाले असून, त्यांनी वाघीरे महाविद्यालयातून बी. ए ची पदवी घेतली आहे. बूथ प्रमुख ते जिल्हाध्यक्ष शेखर वढणे हे मूळ भाजपचे आहेत,
त्यांनी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असल्यापासून, भाजपचे काम करण्यास सुरुवात केली होती. ते 2006 मध्ये सासवड बुथ प्रमुख होते, त्यानंतर सासवड शहराध्यक्ष, पुरंदर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष होते, 2019 मध्ये त्यांच्यावर पक्षाने सातारा जिल्हा लोकसभा
विस्तारक म्हणून जबाबदारी दिली होती, तर 2023 पासून बारामती संघटक सरचिटणीस होते. आत्तापर्यंत संघटनात्मक काम केले, यापुढे बारामती लोकसभेमध्ये बुथ पातळीपर्यंत भाजपला मजबूत करणार आहे. त्यांच्यासाठी जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडणे, नवीन प्रवेश करून घेण्यावर भर देणार आहे. शेखर वढणे, जिल्हाध्यक्ष भाजप.






