पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीला विजयी करा -विजय कोलते यांचे आवाहन
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीला विजयी करा. विजय कोलते यांचे आवाहन.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पक्षाची सत्ता पदच्युत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीला मतदान करावे, असे अवाहन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (बारामती)अध्यक्ष विजय कोलते यांनी केले.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिक नोकरी,व्यवसाय, उद्योग व व्यापाराचे निमित्ताने या दोन्ही शहरात वास्तव्य करतात. यापूर्वी अजित पवार यांचे नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाली तेव्हा या सर्व नागरिकांनी सहकार्य केले होते, दोन्ही महापालिकेत राष्ट्रवादी पक्षाची आघाडी झाल्यामुळे महापालिकेत सत्ता येणे सहज शक्य आहे.
अजितदादा पवार यांचे नेतृत्वाला खंबीर साथ देण्याची गरज आहे, म्हणूनच पुणे जिल्ह्यातील पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादी आघाडीला मतदान करावे, असे अवाहन विजय कोलते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.






