राजकीय

गुळूंचे कोळविहरे गणातून सौ पल्लवी पांडुरंग निगडे देशमुख भाजपाकडून निवडणुकीसाठी इच्छुक


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:

भारतीय जनता पक्षाच्या पुरंदर तालुक्यातील गुळुंचे (कोळविहिरे) गणातून सौ. पल्लवी पांडुरंग निगडे देशमुख या पंचायत समिती, पुरंदर येथे येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज करणार आहेत. पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली व जनतेच्या आशीर्वादाने निवडणूक लढविण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांनी भाजप पुरंदर तालुका अध्यक्ष संजय काका निगडे तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वडणे यांच्याकडे अधिकृतरीत्या उमेदवारीची मागणी केली आहे.

सौ. पल्लवी निगडे देशमुख या पांडुरंग दादा निगडे देशमुख यांच्या धर्मपत्नी आहेत. त्यांचे पती पी. एल. दादा निगडे देशमुख हे महावितरण कंपनी मध्ये उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत राहून ३० एप्रिल २०२२ रोजी रास्ता पेठ, पुणे येथून सेवामुक्त झाले. मे २०२२ पासून पल्लवीताई यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करून भारतीय जनता पक्ष पुरंदर तालुक्यातील कामकाजाची जबाबदारी स्वीकारली.

जून २०२३ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा दक्षिण किसान मोर्चा सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि राज्य किसान मोर्चा अध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी अप टू ७.५ एचपी वीजपंप वीजबिल माफीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला, ज्यास उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्यता देत शेतकऱ्यांना वीजबिल माफीचा दिलासा दिला.

स्थानिक पातळीवर, सौ. पल्लवी निगडे देशमुख या श्री ज्योतिर्लिंग सहकारी पाणीपुरवठा संस्था (घटक क्र. ३) मध्ये अध्यक्ष आणि सचिव या दोन्ही पदांवर १९९९ पासून कार्यरत आहेत. त्यांनी श्री ज्योतिर्लिंग देवस्थानासाठी नीरा नदी स्नानासाठी रथ निर्मितीत सहभाग घेतला तसेच रथाचे लोकार्पणही केले. बोळाई देवी डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या बांधकामाचे कार्य, तसेच प्रमोदभैया काकडे (बांधकाम सभापती, पुणे जिल्हा परिषद) यांच्या निधीतून बोळाई घाट रस्ता सिमेंट काँक्रीटकरण करण्यात त्यांचा सहभाग आहे.

तसेच संजय काका निगडे यांच्या सहकार्याने देवीचा रस्ता तयार करण्याचे कामही सुरू केले आहे.
२०१६ पासून त्या सर्व समाजातील विवाह जमवणी (वीणा मूल्य विवाह) या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत, ज्यामुळे त्यांचा संपर्क संपूर्ण पुणे व सातारा जिल्ह्यात आहे.

त्या म.रा.वी. मंडळात नीरा, बारामती व सासवड परिसरातील जनतेची सेवा करत आहेत. गावातील विद्यमान सरपंच हे देखील त्यांच्या विचारसरणीचे असल्याने विकासकामांना गती मिळत आहे.

एकूणच, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील सक्रिय कार्यामुळे सौ. पल्लवी पांडुरंग निगडे देशमुख यांचे नाव पंचायत समिती, पुरंदर निवडणुकीत प्रबळ दावेदार म्हणून घेतले जात आहे.


Translate »
error: Content is protected !!