हडपसरकरांच्या पाण्याशी प्रशासनाचा खेळ किती दिवस? पाणी हा हक्क, उपकार नाही! हडपसर करांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे – प्रशांत सुरसे
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
हडपसरकरांच्या पाण्याशी प्रशासनाचा खेळ किती दिवस?*
*पाणी हा हक्क, उपकार नाही! हडपसरकरांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे*
*तुकाई टेकडी योजना विद्युत (बुस्टर) पंपिंग सुरू करा, रखडलेल्या योजना कार्यान्वित करा; अन्यथा हडपसरमध्ये तीव्र जनआंदोलन*
*-प्रशांत सुरसे*
पुणे, दि. ११ ऑगस्ट २०२६ : हडपसर परिसरातील गंभीर पाणीप्रश्नाबाबत पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकुमार जगताप तसेच केळकर साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रशांत सुरसे सौ. पल्लवी सुरसे,यांनी निवेदन सादर केले.
हडपसर परिसरातील नागरिक, विशेषतः महिला व कुटुंबांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
हडपसर परिसरातील नागरिकांना नियमित, पुरेसा आणि समान पाणीपुरवठा मिळावा, यासाठी रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्याची तसेच तुकाई टेकडी पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करून विद्युत (बुस्टर) पंपाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
हडपसर गावठाण, गाडीतळ, सातववाडी, गोंधळेनगर, १५ नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, विठ्ठल नगर, ससाणे नगर आणि काळे-बोराटे नगर परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करत आहेत. सन १९९७ पासून पुणे महानगरपालिकेत समावेश होऊनही नागरिकांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा मिळत नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
*सौ. पल्लवी सुरसे, अध्यक्ष – स्वाभिमानी महिला संस्था यांनी यावेळी सांगितले की, “पाणीटंचाईचा सर्वाधिक त्रास महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबांना सहन करावा लागत आहे. नागरिकांना वारंवार आश्वासने नकोत, तर नियमित, पुरेसा आणि सुरक्षित पाणीपुरवठा हवा आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने ठोस उपाययोजना करावी.”*
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत काळे-बोराटे नगर येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरातील ३५ लाख लिटर क्षमतेचा जलसाठा प्रकल्प तसेच हडपसर बस डेपो येथील ४५ लाख लिटर क्षमतेचा जलसाठा प्रकल्प पूर्ण झालेले असतानाही त्यातून अद्याप प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
*या संदर्भात दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी निवेदन तसेच दि. १६ मार्च २०२६ रोजी स्मरणपत्र देण्यात आले होते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दि. ३० मार्च २०२६ पासून पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र आजपर्यंत या आश्वासनाची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच खोटे आश्वासन व लेखी पत्र देऊन पुणे महानगरपालिका हडपसर वासियांचा अपमान करते अशी भावना निर्माण झाली*
*तुकाई टेकडी योजना विद्युत (बुस्टर) पंपाद्वारे सुरू करणे ही प्रमुख मागणी*
*तुकाई टेकडी येथील पाणीपुरवठा योजना सध्या केवळ ग्रॅव्हिटी (उतार)पद्धतीने चालत असल्याने सातववाडी, गोंधळेनगर, महात्मा फुले वसाहत गाडीतळ उन्नतीनगर काळे बोराटे नगर तसेच इतर भागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तुकाई टेकडी येथील पाणीपुरवठा योजना तात्काळ विद्युत (बुस्टर) पंपाद्वारे नियंत्रित करून सुरू करण्यात यावी, अशी ठाम मागणी प्रशांत सुरसे व सौ. पल्लवी सुरसे यांनी केली.*
**१५ नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, विठ्ठल नगरला पाणी पुरवठा होण्याबाबत नियोजन करावे **
**हडपसर बस डेपो येथील पाणीपुरवठा योजनांमधून १५ नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी आणि विठ्ठल नगर परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी तांत्रिक नियोजन करण्यात यावे. या भागांना योजनेतून पाणी देण्यासाठी ठोस कार्यवाही करून नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.**
याशिवाय हडपसर परिसरातील अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे दूषित पाणी मिसळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या गंभीर प्रकाराची तातडीने तपासणी करून दोषी यंत्रणा अथवा संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
पाणीपुरवठा योजनेतील दिरंगाईबाबत संबंधित Jain Irrigation Systems Limited या ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून चौकशी करावी तसेच दोष आढळल्यास ब्लॅकलिस्टसह कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
प्रशासनाला थेट सवाल
पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी आणखी किती वर्षे लागणार?
३० मार्च २०२६ रोजी दिलेले लेखी आश्वासन अद्याप का पाळले गेले नाही?
तुकाई टेकडी पाणीपुरवठा योजना विद्युत (बुस्टर) पंपाद्वारे कधी सुरू होणार?
दूषित पाणीपुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई का होत नाही?
योजनेतील दिरंगाईसाठी जबाबदार ठेकेदारांवर कारवाई कधी होणार?
*प्रशांत सुरसे यांनी सांगितले की, “हडपसरकरांना आश्वासन नको, आता प्रत्यक्ष पाणी हवे आहे. पूर्ण झालेल्या योजना केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ठेवून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणे आम्ही सहन करणार नाही. तुकाई टेकडी येथे विद्युत (बुस्टर) पंप तात्काळ सुरू करावा आणि १५ नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी व विठ्ठल नगर परिसराला पाणीपुरवठा करण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा.”*
*ऑगस्टअखेरपर्यंत कार्यवाही करा; अन्यथा जनआंदोलन*
हडपसरच्या गंभीर पाणीप्रश्नाकडे पुणे महानगरपालिका प्रशासनाने सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून पाहून तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. संबंधित अधिकाऱ्यांनी हडपसर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि निवेदनातील मागण्यांवर कालबद्ध कार्यवाही करावी.
तसेच पाणीपुरवठा योजना नेमक्या कोणत्या तारखेपासून सुरू होणार, तुकाई टेकडीवरील विद्युत (बुस्टर) पंपाबाबत काय निर्णय घेण्यात आला आणि १५ नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी व विठ्ठल नगर परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली, याबाबत प्रशासनाने तात्काळ लेखी उत्तर द्यावे.
*ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झाली नाही किंवा लेखी उत्तर देण्यात आले नाही, तर हडपसर परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी पुणे महानगरपालिका प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा प्रशांत सुरसे व सौ. पल्लवी सुरसे यांनी दिला.*
या वेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव प्रशांत सुरसे, सौ. स्वाभिमानी महिला संस्थेचे अध्यक्ष पल्लवी सुरसे नंदकुमार अजोतीकर, बापूसाहेब पोटे, गणेश जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.






