ब्रेकिंग न्यूज

दौंडज येथे कार आणि दुचाकी स्वाराचा भीषण अपघात ; दुचाकी स्वाराचा मृत्यू


संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
दौंडज येथे भीषण अपघात; फलटणच्या २४ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुरंदर : पुरंदर तालुक्यातील दौंडज येथे झालेल्या अपघातात फलटण तालुक्यातील २४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हिम्मत पवार (वय २४, रा. सात सर्कल होळ, साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांचा २७ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास दौंडज (ता. पुरंदर) येथे अपघात झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने जेजुरी आयसीयू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी साडेपाच वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय, जेजुरी येथे आणण्यात आला.

या घटनेची माहिती सुहास सतीश उंबरे यांनी दिली असून, जेजुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ७४/२०२६ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव तपास करत आहेत


Translate »
error: Content is protected !!