केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्री रामनाथ ठाकूर यांची पुरंदर तालुक्यातील फळ प्रक्रिया केंद्राला अचानक भेट
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्री रामनाथ ठाकूर यांची पुरंदर
तालुक्यातील फळ प्रक्रिया केंद्राला अचानक भेट
केंद्रीय कृषीराज्यमंत्री श्री रामनाथ ठाकूर व श्री सुनील बोरकर संचालक निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण कृषी विभाग महाराष्ट्र राज्य यांनी पुरंदर तालुक्यातील वाळुंज गावातील नितीन आबा इंगळे यांच्या मॅग्नेट प्रकल्पातून साकार झालेल्या नितीन फुड्स या फळ प्रक्रिया प्रकल्पास अचानक सदिच्छा भेट दिली. या प्रकल्पातील स्वच्छता नीटनेटकेपणा व छान पद्धतीने चाललेली फळ प्रक्रिया पाहून समाधान व्यक्त केले व कामाचे खूप कौतुक केले.
या ठिकाणी उत्पादित झालेल्या आंबा पल्प, आंब्याच्या स्लाईस, जांभूळ पल्प व स्लाईस, पेरू, चिक्कू सीताफळ, फणस इत्यादी फळापासून तयार झालेले पल्प व जाम पाहून समाधान व्यक्त केले.
तसे पाहिले तर पुरंदर तालुक्यात छोटे-मोठे फळ प्रक्रिया करणारे खूप युनिट आहेत प्रत्येक जण आपापल्या परीने नीट नेटकेपणाने फ्रेश फळावर प्रक्रिया करून फ्रोजन पल्प निर्मितीचे काम मोठ्या प्रमाणावर करत असतात यामधून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेताच्या जवळच चांगला बाजार भाव मिळण्यास मदत होते व नाशवंत मालाचे टिकवनक्षम उपपदार्थ बनवण्यात या सर्व युनिटचे मोलाचे काम होत असते तर अशाच कामाची पाहणी करण्यासाठी मंत्रीमहोदय यांचा दौरा पुरंदर तालुक्यातील वाळुंज या ठिकाणी नितीन फुड्स येथे यशस्वी पार पडला.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदामाप्पा इंगळे व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अजय कैलास इंगळे उपस्थित होते वाळुंज गावचे पोलीस पाटील मोहन इंगळे व माजी उपसरपंच स्वप्निल नवले, अनिल इंगळे प्रगतशील शेतकरी संजय चौरे, उद्योजक रेवनाथ जाधव, बापू शेलार, ज्ञानेश्वर पाटील, सुशील झेंडे, पृथ्वीराज ढुमे, मयूर कुंजीर, युवराज जाधव, उमेश झेंडे, कानिफनाथ झेंडे, वैशाली सुनील शिंदे, शंकर झेंडे, सौरभ शिंदे, सचिन मोटघरे, दशरथ पोरे, अतुल जाधव, देवराम काळे, विठ्ठल झेंडे, विशाल खटाटे, प्रदीप काळे, चेतन काळे व कृषी विभागातील अधिकारी श्री जेजुरकर साहेब विभागीय कृषी महासंचालक पुणे, श्री कोचाळे जिल्हा कृषी अधिकारी पुणे, श्रीमती जोशी मॅडम उपविभागीय कृषी अधिकारी बारामती, चव्हाण तालुका कृषी अधिकारी पुरंदर, श्री डोंबाळे कृषी अधिकारी बारामती, धायगुडे साहेब, कचरे साहेब, कदम साहेब, खेडकर साहेब, भगत साहेब, जायपत्र साहेब, गीते साहेब, भांबोरे साहेब, श्रीमती यादव मॅडम, व परिसरातील महिला आणि शेतकरी उपस्थित होते…






