ब्रेकिंग न्यूज

मल्हार सागर जलाशय 100% भरला; शिवसेना नेत्या डॉ. ममता ताई लांडे शिवतारे यांच्या हस्ते जलपूजन संपन्न !


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
मल्हार सागर जलाशय १००% भरला; शिवसेना नेत्या डॉ. ममता ताई लांडे-शिवतारे यांच्या हस्ते जलपूजन

पुरंदर तालुक्यातील कऱ्हामाई नदीवरील मल्हार सागर (नाझरे धरण) शंभर टक्के भरल्याच्या आनंदात शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला नेत्या डॉ. ममता ताई लांडे-शिवतारे यांच्या हस्ते धरणाच्या पाण्याचे खण, नारळ अर्पण करून विधीवत जलपूजन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी पंचायत समिती सदस्य माणिक निंबाळकर, शिवसेना तालुकाध्यक्ष उमेश गायकवाड, माजी सभापती अतुल म्हस्के, शिवसेना युवक अध्यक्ष ॲड. नितीन कुंजीर यांच्यासह पुरंदर तालुक्यातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मल्हार सागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून आगामी हंगामासाठी सिंचनाच्या दृष्टीने हा दिलासादायक टप्पा मानला जात आहे.


Translate »
error: Content is protected !!