ग्रीन सिटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तायक्वांदो स्पर्धेत नेत्रदीपक यश!
संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
ग्रीन सिटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तायक्वांदो स्पर्धेत नेत्रदीपक यश
वेळापूर : सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून पिलेव येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय तायक्वांदो स्पर्धेत संत सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्रीन सिटी इंग्लिश मीडियम स्कूल, वेळापूरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले.
या स्पर्धेत यशश्री भगत हिने २२ ते २४ किलो वजन गटात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक, तर वैष्णवी भगत हिने २६ ते २९ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले.
तसेच आदित्य कदम याने ३२ ते ३५ किलो वजन गटात रौप्यपदक, तर मेघराज माने देशमुख यानेही रौप्यपदक मिळवत द्वितीय क्रमांक संपादन केला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र गिरमे (रंजन भाऊ), सचिव, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका प्रतीक्षा भडके मॅडम तसेच मुख्य क्रीडा प्रशिक्षक उद्धव जाधव सर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका क्रीडा अधिकारी रणजीत लोहार उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.






