क्राईम न्यूज

उरळी कांचन मध्ये पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार गणेश दाभाडे यांचा अपघातात जागीच मृत्यू


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे : उपसंपादक प्रा संदीप टिळेकर :
उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार गणेश दाभाडे यांचा अपघातात जागीच मृत्यू

उरुळी कांचन, ता. १९ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. १८) रात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सहाय्यक फौजदार गणेश दाभाडे (वय 49) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर, ग्रीन पार्क हॉटेलजवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश दाभाडे हे पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दाभाडे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळी न थांबता वाहनासह पळ काढला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


Translate »
error: Content is protected !!