” काँग्रेसचा झुरंगे फॅक्टर अजितदादा पवारांच्या पॅनल सोबत ; सोमेश्वर निवडणुकीत पुरंदरचे राजकीय गणित बदलणार?
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे : उपसंपादक नवनाथ राणे :
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत काँग्रेसच्या दत्ताशेठ झुरंगे यांची भूमिका स्पष्ट; अजितदादा पवार पॅनेलला बिनशर्त पाठिंबा
सासवड | प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ताशेठ झुरंगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार’ पॅनेलला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
याबाबत दत्ताशेठ झुरंगे यांनी आज श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार तसेच राज्यसभा खासदार पार्थदादा पवार यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा विकास, सभासद शेतकऱ्यांचे हित आणि कारखान्याच्या भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने आपण सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्यासोबत काम करणार असल्याचे दत्ताशेठ झुरंगे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पुरंदर तालुक्यातील काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते सुनील आसवलीकर यांनीही सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने आपली भूमिका स्पष्ट केल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पुरंदर तालुक्यातील विविध राजकीय नेत्यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार असून, दत्ताशेठ झुरंगे यांच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे अजितदादा पवार पॅनेलला पुरंदरमध्ये राजकीय बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
“काँग्रेसचा झुरंगे फॅक्टर अजितदादा पवारांच्या पॅनेलसोबत; सोमेश्वर निवडणुकीत पुरंदरचे राजकीय गणित बदलणार?”






