आषाढी वारीत हरवलेले 75 वर्षीय वारकरी मारुती नामदेव माने यांचा अद्याप शोध नाही ; माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
आषाढी वारीत हरवलेले ७५ वर्षीय वारकरी मारुती नामदेव माने यांचा अद्याप शोध नाही; माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस
सासवड (प्रतिनिधी): आषाढी वारीसाठी आलेले वारकरी मारुती नामदेव माने (वय ७५) हे १२ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाले असून त्यांच्या शोधासाठी कुटुंबीय आणि दिंडीतील सहकारी प्रयत्न करत आहेत. संबंधित व्यक्तीबाबत माहिती देणाऱ्यास किंवा शोधून देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येणार असल्याचे कुटुंबीयांनी जाहीर केले आहे.
तक्रारदार तथा दिंडी प्रमुख बाळासाहेब रामचंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड बायपासवरील पवार वस्ती येथे संभाजी नाना पवार यांच्या घरी मुक्कामादरम्यान मारुती माने हे सकाळी शौचालयासाठी बाहेर गेले. मात्र त्यानंतर ते परत आले नाहीत. त्यांचा परिसरात तसेच विविध ठिकाणी शोध घेण्यात आला, परंतु अद्याप त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
मारुती माने हे योगेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली येथील रहिवासी असून त्यांची जन्मतारीख १ जानेवारी १९५१ आहे. त्यांच्याशी संबंधित डिजिटल कागदपत्रे उपलब्ध असल्याची माहिती तक्रारदारांनी दिली.
या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा ते आढळल्यास खालील क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📞 बाळासाहेब रामचंद्र पाटील: 9960262541
📞 संपर्क: 9765724113 / 9823965861






