भिवडी येथे डॉ भाऊसाहेब शिंदे यांचं रामोशी समाजाच्या विविध मागणीसाठी आमरण उपोषण चालू
रामोशी बेरड बेडर समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी भिवडी येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ भाऊसाहेब शिंदे यांचं आमरण उपोषण चालू,
राज्यात रामोशी बेरड बेडर समाजाची लोकसंख्या 80 लाख असून, समाज राजकीय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या मागास आहे, यासाठी या समाजाचा अनुसूचित जमाती मध्ये समावेश करावा, राज्य सरकारने आद्य क्रांतिवीर राजीव उमाजी नाईक महामंडळ स्थापन केल्या असून त्या मंडळाचे अध्यक्ष रामोशी बेरड बेडर समाजातल्या व्यक्ती
असावा, या समाजातील एका व्यक्तीला तात्काळ राज्य सरकारने विधान परिषदेवर संधी द्यावी, तसेच राजे उमाजी नाईक जे यांची जयंती संसद भवन मध्ये 7सप्टेंबर रोजी साजरी करण्यात यावी या विविध मागण्यासह आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक भिवडी या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलं याची राज्य सरकारने व केंद्र सरकारने गंभीर दखल घ्यावी असे
आवाहन सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी केल यावेळी रामोशी समाज नेते रवीकाका खोमणे, सयाजी बुधवले, विकास भांडवलकर, रवी देशमुख, राजू तोरडमल, जयसिंग सरक, बापू मोकाशी, तुषार भैय्या खोमणे, लक्ष्मण भैया खोमणे यांनी साखळी उपोषण चालू केलं याचबरोबर बेरड बेडर रामोशी समाज राष्ट्रीय संघ, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक युथ फाउंडेशन, एम एम ग्रुप
महाराष्ट्र, बेरड रामोशी समाज समिती, रामोशी महासंघ महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय परिवर्तन संघ, स्वाभिमानी रामोशी महासंघ महाराष्ट्र, विश्वक्रांती राजे उमाजी नाईक संघटना, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक समाधी सुधारक मंडळ भिवडी, तसेच अनेक संघटना, मस्त ग्रामस्थ भिवडी यांनी समाजाच्या विविध मागणीसाठी भाऊसाहेब शिंदे यांनी केलेल्या आभार उपोषणास जाहीर पाठिंबा जाहीर केला






