पुरंदरचे गुणवंत रत्न पुरस्कार सोहळा संपन्न : जालिंदर भाऊ कामठे मित्रपरिवाराचा उपक्रम
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
उपसंपादक सह्याद्री माझा नवनाथ राणे :
पुरंदरचे गुणवंत रत्न पुरस्कार संपन्न
सासवड : सामाजिक, आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल जवळार्जुनचे माजी सरपंच अण्णासाहेब मारुती राणे आणि खळदचे माजी सरपंच बबनराव बाबुराव कामथे यांना “पुरंदर गुणवंत रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री. जालिंदरभाऊ कामठे मित्र परिवाराच्या वतीने सासवड येथे आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदरभाऊ कामठे आणि विजयराव कोलते यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी निरा मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदूकाका जगताप, भानुदास जगताप, हरिभाऊ फुले, पत्रकार दत्तानाना भोंगळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामठे, शिवाजीराव साळुंखे, सचिन पठारे, नंदकुमार कामठे, जाधव गुरुजी, शिवाजी गोडसे, संग्राम राणे, आप्पासो राणे, शिवाजी राणे, विजय राणे, सुनील पोटे यांच्यासह खळद व जवळार्जुन येथील ग्रामस्थ आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत अण्णासाहेब राणे आणि बबनराव कामथे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजासाठी या दोन्ही मान्यवरांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर पुरंदर-हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी अण्णासाहेब राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान केला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव होऊन त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






