ताज्या घडामोडी

सासवड मधील एका नामांकित शाळेतील शिक्षकाचा प्रताप विद्यार्थ्याने वही आणली नाही म्हणून कानावर जोरदार थप्पड, कानाचा पडदा फाटला


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा

संतापलेल्या शिक्षकांचा प्रताप विद्यार्थ्याला मारहाण सासवडच्या नामांकित शाळेच्या शिक्षकावर पुरंदर तालुक्यातील या शाळेतील शिक्षकावर गुन्हा दाखल

पुरंदर तालुक्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघीरे हायस्कूल सासवड या शाळेत त्याच बरोबर दिवे येथील श्रीराम गुरुकुल विद्यालयातील शिक्षका कडुन विद्यार्थ्यांना

मराहाण झाल्याच्या घटना घडली असून या संदर्भात सासवड पोलीस ठाण्यात दोन्ही घटनांचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सासवड पोलासांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघिरे हायस्कूल येथे गणिताच्या तासादरम्यान गणिताचे शिक्षक गणेश पाठक

यांनी मुलांना गणिताच्या वह्या बेंच वरती काढून ठेवायला सांगितल्या. परंतु हर्षल याची वही घरी राहिली म्हणून तो शांत बसला असता शिक्षक गणेश पाठक यांनी वह्या चेक

करत असताना हर्षल याच्या डाव्या कानाला जोरात कानाखाली चापट मारून गंभीर दुखापत केली असुन त्याच्या कानाचा पडदा फाटला आहे. असल्याची घटना

घडली असून यासंदर्भात संशयित आरोपी गणेश पाठक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दिवे येथील श्रीराम गुरुकुल पाठशाळा येथे वेदमंत्राचे

गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेत असताना हा बालक आहे हे माहीत असताना. त्याची संभाळण्याची व काळजी घेण्याची जबाबदारी असताना देखील यातील संशयित आरोपी नामे

मंदार शहरकर (पुर्ण नाव माहीत नाही) रा. दिवे ता पुरंदर जि पुणे याने मुलगा जेवन करीत नाही. शाळेत मुलांसोबत भांडणे करीत असतो असे म्हणुन काठीने पाठीवर पायावर

मारहाण केली आहे.
या दोन्ही आरोपीच्या विरोधात बालकांनचे हक्क या कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हिप्परकर करीत आहेत


Translate »
error: Content is protected !!