प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे आणि चैतन्य बहुउद्देशीय कृषी संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान सुरू
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा – हनुमंत वाबळे
रस्ता सुरक्षा सप्ताह अभियाना अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे आणि चैतन्य बहुउद्देशीय कृषी संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भालेराव यांच्या संयुक्त विद्यमान
रस्ता सुरक्षा कार्यक्रम १० जानेवारी २०२५ रोजी आयोजित केला गेला. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चनाताई गायकवाड व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रसंगी प्रादेशिक परिवहन
कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक विनोद जाधव व संदीप मुरकुटे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक रेश्मा शेख व अमृता क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिबिर दौऱ्यामध्ये आलेल्या लोकांना त्यांच्या रस्ता सुरक्षिततेचा बद्दल माहिती
देण्यात आली. सर्वसामान्य जनतेत असलेला एक समज आहे की पायी चालतांना डाव्या बाजूने चालावे परंतु डावी बाजू ही वाहना करता आणि उजवी बाजू ही पायी चालणाऱ्या करत
WALK ON RIGHT ही गोष्ट मुख्यत्वे अधोरेखित केली त्याचबरोबर लोकांची जनजागृती पर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित आनंद पानसरे , गणेश भिसे , आशिष पवार,संपत तळेकर,गणेश तळेकर , मयूर चव्हाण , कुलदीप गावडे,मनोज वारघडे , यशवंत भोसले,चेतन झेंडे,राहुल कोलते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर कुदळे यांनी केले कार्यक्रमाचे आभार सुभाष इंदलकर यांनी मानले






