आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने सासवड येथे 30 मोफत सामुदायिक विवाह सोहळा 24 मे रोजी पार पडनार
सह्याद्री माझा :::
आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने सासवड येथे 30 मोफत सामुदायिक विवाह सोहळा 24 मे रोजी
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक : पुरंदर तालुक्यातील आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने, सासवड येथील पुरंदर हायस्कूलच्या प्रांगणात, 30 मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन 24 मे रोजी दुपारी 1:30 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
यासाठी शुभआशीर्वाद देण्यासाठी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, दत्तामामा भरणे क्रीडा मंत्री, प.पु .श्री पोपट महाराज स्वामी, ह.भ. प. त्रिगुण गोसावी महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार
असल्याचे, संजय ज्ञा. जगताप संस्थापक अध्यक्ष आदर्श क्रांती संघटना पुरंदर यांनी ही माहिती दिली. पुणे जिल्ह्यातून विविध पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचेही, सांगण्यात आले. तालुक्यातील बहुतांश शेतकरी कुटुंब आपल्या मुला मुलींचे लग्न करण्यासाठी, नाईलाजास्तव, नातेवाईक, पतपेढ्या,
खाजगी सावकार यांच्याकडून कर्ज घेऊन विवाह पार पाडीत आहेत. भरपूर प्रमाणात शेती कमी, दुष्काळी भाग आणि कमी उत्पन्नामुळे कर्ज फेडण्याची क्षमता राहत नाही, त्यामुळे विनाकारण अवास्तव वसुलीस तोंड द्यावे लागत आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम हा नव वधूवरांच्या प्रापांचिक जीवनावर होऊन, अनाठाई गोष्टींना सामोरे जावे
लागत आहे. संघटना गेली 18 वर्ष हा मोफत सामुदायक सोहळा पुरंदर तालुक्यात करताना, 620 लग्न संघटनेच्या वतीने लावण्यात आली आहेत. तर आत्ता 19व्या वर्षातील 30 मोफत सामुदायिक विवाह सोहळा पार पडत आहेत, या विवाह सोहळ्यातील वधू-वरांना
लग्नाचा पोशाख, जीवनाविषयी उपयोगी भांडी, बूट, चप्पल, मंगळसूत्र तसेच लग्नात येणाऱ्या सर्व व्यक्तींची भोजनाची व्यवस्था, भव्य अशी मिरवणूक अशा प्रकारची व्यवस्था संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. शासनाच्या शुभ मंगल योजनेच्या नियमानुसार संबंधित जोडप्यास 10,000 हजार रुपये दिले जाणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष बाळासो भिंताडे, उपाध्यक्ष विकास जगताप व सचिव राहुल इनामके यांनी ही माहिती दिली.






