15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिनानिमित्त सासवडला स्वातंत्र्य सैनिक स्मारकाला अभिवादन!
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
१५ ऑगस्ट २०२६
स्वांतंत्र्य दिनानिमित्त सासवडला स्वातंत्र्य सैनिक स्मारकाला अभिवादन*
८० व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सासवड, धान्य बाजार पेठ येथील
” स्वातंत्र्य सैनिक स्मारक ” याठिकाणी आजी माजी सैनिक प्रतिष्ठान पुरंदर आणि स्वातंत्र्य सैनिक परीवार , पुरंदर यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी आजी माजी सैनिक प्रतिष्ठान पुरंदर चे सभासद किरण पुरंदरे , धनंजय जगताप उपस्थित होते, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सैनिक परिवारातील संदीप इनामके, आस्लम आत्तार, सौ. इंदिरा रावसाहेब पवार , दिगंबर म्हेत्रे, अमृता म्हेत्रे, दिलीप चौधरी,निरंजन जगताप आदींनी
स्वातंत्र्य लढ्यातील चळवळीत भाग घेतलेल्या, तसेच तुरुंगवास भोगलेल्या, जुलमी ब्रिटिश सरकारला नमवलेल्या आपल्या पूर्वजांना आणि पुरंदर परीसरातील स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना पुष्पांजली वाहुन अभिवादन केले.
*स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेऊन आपल्या घरावर तुळशीपत्र ठेऊन स्वातंत्र्यसाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक यांच्या आठवणी उजाळा फक्त स्वातंत्र्य दिनानिमित्त न ठेवता तो कायम आपल्या स्मरणात असावा* असा संदेश ज्येष्ठ प्राध्यापिका इंदिरा रावसाहेब पवार यांनी दिला.
*स्वातंत्र्य सैनिक स्मारक सुशोभीकरण व्हावे आणि त्यांच्या स्मृतींना कायम उजाळा मिळावा यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावे* असे निवेदन माजी सैनिक किरण पुरंदरे यांनी दिले.
*पुरंदरची बारडोली सासवड* म्हणून उल्लेख करताना भविष्यात ऐतिहासिक माहितीपर पुस्तक आणि स्वातंत्र्य पूर्व काळातील पुरंदरच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या ऐतिहासिक घटनांविषयक चित्रपटाविषयी चित्रपट कला दिग्दर्शक संदीप इनामके यांनी माहिती दिली.*
*बांधकाम व्यावसायिक आस्लम आत्तार यांनी*
*पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देत*
*भविष्यात उपयुक्त कार्यक्रम आणि शासकीय व ग्रामस्थ यांच्या वतीने पाठपुरावा करून नविन पिढीला हा ऐतिहासिक ठेवा कसा जपता येईल याविषयी माहिती दिली*
दिलीप चौधरी, दिगंबर म्हेत्रे आणि उपस्थित ग्रामस्थांनी स्वातंत्र्य सैनिक यांच्या आठवणींना उजाळा देऊन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.






