ताज्या घडामोडी

भारतीय जनता पार्टी सासवड शहर यांच्या वतीने “आणीबाणी – काळा दिवस “कार्यक्रम संपन्न


संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::

भारतीय जनता पार्टी, सासवड शहर यांच्यावतीने ‘आणीबाणी – काळा दिवस’ कार्यक्रम संपन्न.

सासवड, दि. २५ जून २०२५: भारतीय जनता पार्टी, सासवड शहर यांच्यावतीने आज, दि. २५ जून २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता दौलत हाईट्स येथील मध्यवर्ती कार्यालयात ‘आणीबाणी – काळा दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पडले.

या कार्यक्रमात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीच्या काळातील ऐतिहासिक प्रसंगाची स्मृती आणि त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी पुरंदरचे माजी आमदार मा. अशोकभाऊ टेकवडे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यांनी आणीबाणीच्या काळात लोकशाहीवर झालेल्या आघाताची सविस्तर माहिती देताना, त्या काळातील संघर्ष आणि बलिदानाची आठवण करून दिली. यावेळी आणीबाणीच्या काळात अटकेत असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पासाहेब पुरंदरे आणि प्रमोदकाका खळदकर उपस्थित होते. त्यांनी त्या कठीण काळातील अनुभव कथन करत उपस्थितांना प्रेरणा दिली.

कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मा.पंडितदादा मोडक, सासवड शहराअध्यक्ष मा.आनंद संजय जगताप, मा.संदीपबापू हरपळे, मा.श्रीकांत थिटे, मा.जालिंदरदादा जगताप, मा.जयेंद्र निकम, मा.राहुल भोंडे, मा.सुरेश गिरमे, मा.रूपाली क्षीरसागर, मा.सिद्धी शेलार, मा.उदयराज जगताप, मा.निरंजन फडतरे, मा.हेमंत जैन, आदी उपस्थित होते. उपस्थितांनी या ऐतिहासिक प्रसंगाची स्मृती जपण्याचा आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी सजग राहण्याचा संकल्प केला.


Translate »
error: Content is protected !!