पुरंदर तालुक्यातील विद्यार्थिनी जान्हवी कदम हिचे घवघवीत यश, जिल्हास्तरीय शिष्यवृत्तीधारक म्हणून निवड
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे
पुणे जिल्ह्यातील विद्यार्थिनी जान्हवी कदम हिचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय शिष्यवृत्तीधारक म्हणून निवड
सासवड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) २०२६ मध्ये साकुर्डे येथील मातोश्री जिजाई सोपानराव जाधव माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. जान्हवी धनश्री सुनील कदम हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
जान्हवी हिने ३०० पैकी २४४ गुण (८१.३३ टक्के) मिळवत जिल्हास्तरीय शिष्यवृत्तीधारक म्हणून स्थान मिळवले. तसेच नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतही तिने ९७.५० टक्के गुण मिळवून पुरंदर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याने तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जान्हवीच्या या यशामागे तिची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. तिचे शिक्षक अनंता जाधव व सुरेखा जाधव यांनी केलेल्या मार्गदर्शनाचेही विशेष कौतुक होत आहे.
या यशाबद्दल जान्हवी कदम, तिचे पालक, शिक्षक आणि विद्यालयाचे सर्वत्र अभिनंदन होत असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. पुरंदर तालुक्यासह बेलसर परिसरासाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.






