7 एप्रिल 2025 रोजी सासवड नवीन प्रशासकीय इमारती समोरील ध्वज स्तंभास काळा झेंडा उभारण्याची परवानगी द्यावी : महेश राऊत
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा:::
सासवड नवीन प्रशासकीय इमारती समोरील ध्वज स्तंभास काळा झेंडा फडकवण्यास मागितली परवानगी
ग्राहक हक्क संघर्ष समिती पुणे जिल्हा अध्यक्ष महेश राऊत यांनी पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या रिंग रोड मध्ये चाललेल्या अनागोंदी कारभारासंदर्भात आवाज उठवला, मूळ शेतकरी सोडून जे धन दांडगे
यांनी जमिनी खरेदी केल्या त्या विकासकांना कागदपत्रांमध्ये फेराफेरी करून मोठा भ्रष्टाचार झाला आहे असे निदर्शनास महेश राऊत यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना निवेदनाद्वारे सांगितले,
पुरंदर तालुका उपविभागीय अधिकारी यांच्या समोरही हा विषय त्यांनी मांडला होता, परंतु त्यांच्या विषयाला केराची टोपली दाखवण्यात आली यावर महेश राऊत यांनी पुणे जिल्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे
धाव घेत न्याय मागितला आहे यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लक्ष घालून चाललेला भ्रष्टाचार थांबवण्यात येईल असे सांगण्यात आले, यावर आज पर्यंत कुठलीही कारवाई न झाल्यामुळे ग्राहक संघर्ष
समितीचे अध्यक्ष महेश राऊत यांनी तालुक्यातील सासवड येथील प्रथम नवीन प्रशासकीय इमारतीसमोर असलेल्या स्तंभास सात एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता काळा झेंडा उभारण्याची परवानगी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितली आहे






