ताज्या घडामोडीशैक्षणिक

माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांच्याकडून जेजुरी मध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप


*जेजुरीला माजी मंत्री विजय शिवतारेंकडून विद्यार्थ्यांना वह्या वाटप*

जेजुरी येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते आज शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप आबा यादव, तालुकाप्रमुख हरिभाऊ लोळे, माजी सभापती अतुल म्हस्के, शहर प्रमुख दिनेश सोनवणे, विद्यार्थी संघटनेचे सुरज मुळीक, नितीन पोटे, ज्ञानेश्वर शिंदे, नितीन यादव, अजित चव्हाण यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले, पुरंदर आणि हवेली तालुक्यात मी विद्यार्थ्यांना तीन लाख वह्या वितरित करणार आहे. या अभियानाला १५ ऑगस्ट पासून सुरवात करण्यात आलेली आहे. आज जिजामाता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यालय, ए.सी. हुंडेकरी ज्युनिअर कॉलेज, दादा जाधवराव प्राथमिक विद्यालय येथे भेट दिली आणि विद्यार्थ्यांची संवाद साधला.
आजचे विद्यार्थी उद्याच्या भारताच्या विकासाचा पाया बनून आपल्या कुटुंबासह समाजाची सेवा करणार आहेत. शाळा, माता-पिता, गाव तसेच तालुक्याचे नाव उज्वल करायचे कार्य ही पिढी करेल यात मला शंका नाही. उद्याचा भारत घडविण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. आज या उपक्रमामध्ये विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा दिल्या. त्यांना अधिकाधिक यश संपादन व्हावं यासाठी जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाकडे माझी प्रार्थना आहे असेही शिवतारे म्हणाले.

शिवतारे पुढे म्हणाले, जेजुरी शहरात देवस्थान विकास आराखडा व शहरातील विविध कामांना मी आमदार नसताना देखील न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यमान आमदारांनी शहराचा बट्ट्याबोळ करून टाकला आहे. ठरावीक नगरसेवकांच्या खाबुगिरीमुळे शहराच्या विकासाला चालना मिळत नाही अशी स्थानिक लोकांचीच तक्रार आहे. विद्यमान आमदारांचा या सगळ्या प्रकाराला वरदहस्त आहे. पुरंदरला पहिल्यांदा इतका कुचकामी प्रतिनिधी मिळाल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.


Translate »
error: Content is protected !!