सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या मराठा प्रबोधन यात्रे विषयी अखिल भारतीय मराठा महासंघ पुरंदर संघाची मीटिंग संपन्न
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मासिक मीटिंग शिवतीर्थ सासवड या ठिकाणी घेण्यात आली. यात सप्टेंबर महिन्यात महासंघातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत चर्चा
करण्यात आली. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुक्यात घेण्यात येणाऱ्या मराठा प्रबोधन यात्रेला शनिवार दिनांक १४ सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. यावेळी
उपस्थित अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शलीलमहाराज जगताप, संदीपदादा जगताप, जयेंद्रजी निकम, श्रीकांत जगताप, युवकचे तालुकाध्यक्ष आकाश ढुमे, सासवड शहराध्यक्ष अक्षय मारणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.






