ताज्या घडामोडी

ढवळे वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष सुभाष ढवळे यांची जलसंपदा विभागाचे सचिव डॉ.हेमंत धुमाळ यांची सदिच्छा भेट!


संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
ढवळे वधू-वर सूचक मंडळाचे अध्यक्ष सुभाष ढवळे यांची जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. हेमंत धुमाळ यांची सदिच्छा भेट

पुणे : ढवळे वधू-वर सूचक मंडळाचे अध्यक्ष श्री. सुभाष ढवळे यांनी पुणे येथील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सिंचन भवन येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. हेमंत धुमाळ यांची त्यांनी भेट घेतली.

या भेटीदरम्यान डॉ. हेमंत धुमाळ यांनी श्री. सुभाष ढवळे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी डॉ. हेमंत धुमाळ यांच्या हस्ते श्री. सुभाष ढवळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग धुमाळ, श्री. योगेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक श्री. जनार्दन भागवत, अॅड. आकाश ढवळे यांच्यासह विविध अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!