ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

16 जानेवारी रोजी किल्ले पुरंदर येथे पार पडणार श्री शंभुराज्याभिषेक सोहळा त्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिर


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा

१६ जानेवारी रोजी किल्ले पुरंदर येथे पार पडणार श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा त्यानिमित्त होणार भव्य रक्तदान शिबिर सोहळा

हिंदवी स्वराज्याचे द्वितीय छत्रपती आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४५ वा श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा गुरुवार, दि.१६ जानेवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन वा. यावेळेत पार पडणार असून सोहळ्यासाठी जास्तीत जास्त शिवशंभुप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवपुत्र शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्ट यांच्याकडून करण्यात आले आहे.

पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, माढाचे आमदार अभिजीत पाटील आणि सांगोलाचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख हे या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी असणार आहेत. या सोहळ्यामध्ये दत्तात्रय भोसले यांना कृषी, सोशल हंड्रेड फाउंडेशन यांना सामाजिक, शिरीष देशमुख यांना उद्योजकता क्षेत्रातील कार्याबद्दल शंभुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून विधी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सचिन वाघ यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. वीरा मल्टीस्पोर्ट्स अकॅडमी व मर्दानी आखाडा, पुणे यांचे साहसी खेळांचे प्रात्यक्षिक या सोहळ्यातील विशेष आकर्षण असणार आहे.


Translate »
error: Content is protected !!