ताज्या घडामोडीपुणे

आमराई पाझर तलावातील पाण्याचा शेतकऱ्यांना फायदा – मा सभापती दत्तात्रय काळे


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::

आमराई पाझर तलावातील पाण्याचा शेतकऱ्यांना फायदा- दत्तात्रय काळे

आमराई पाझर तलावातील पाण्याचे जलपूजन

गराडे दि. २७ (वार्ताहर ) ः भिवरी (ता.पुरंदर ) येथील पंचक्रोशीला वरदान ठरलेला आमराई बंधारा पाण्याने पूर्ण क्षमतेने भरला आहे.याचा फायदा येथील शेतपिके,फळबाग वाढीसाठी,पिण्याच्या पाण्यासाठी होईल असे प्रतिपादन पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय काळे यांनी सांगितले.

आमराई तलावातील पाण्याचे जलपूजन भिवरी गावच्या सरपंच मोनाली कटके व उपसरपंच मारुती कटके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री. काळे बोलत होते.

यावेळी भिवरी गावच्या सरपंच मोनाली कटके, उपसरपंच मारुती कटके, माजी उपसरपंच जगन्नाथ कटके, भैरवनाथ सेवा मंडळाचे उपाध्यक्ष दत्तात्रय कटके, विर नेताजी क्रिडा मंडळाचे कार्याध्यक्ष विजय ढवळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, सामाजिक कार्यकर्ते राहुल कटके,दत्तात्रय गायकवाड,

नवनाथ भिसे, पांडुरंग कटके, हिरामण कटके ,अनिल कटके, योगेश कटके,ग्रामविकास अधिकारी रमेश राऊत आदी उपस्थित होते.

भिवरी (ता.पुरंदर ) येथील आमराई पाझर तलावाचे काम माजी आमदार संभाजी कुंजीर यांच्या काळात १९८२ साली पुर्ण झाले होते.आमराई पाझर तलावाच्या दुरुस्ती मजबूतीकरणामुळे पुढील २५ वर्ष परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे.जलयुक्त शिवार योजनेमुळे पुरंदरचा पश्चिम भागाचा चांगला फायदा झाला आहे.जलसंपदा व जलसंधारण माजी राज्यमंञी तथा पुरंदर हवेली तालुक्याचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्या माध्यमातून या विकास योजना राबविण्यात येत असल्याचे माजी उपसभापती दत्ताञय काळे यांनी सांगितले.
या तलावाखाली व आजुबाजुला साधारण १५ विहीरी व १० विंधन विहीरी आहेत. याचा फायदा शेतक-यांना होईल असे सरपंच मोनाली कटके व उपसरपंच मारुती कटके यांनी सांगितले.

फोटो ओळीः- भिवरी ( ता. पुरंदर ) येथील आमराई पाझर तलावातील पाण्याचे जलपूजन करीत असताना मोनाली कटके समवेत मारुती कटके, दत्तात्रय काळे , जगन्नाथ कटके, दत्तात्रय कटके, विजय ढवळे व इतर मान्यवर


Translate »
error: Content is protected !!