क्राईम न्यूजब्रेकिंग न्यूज

Crime news: सासवड पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी सासवड गोळीबारातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
सासवड पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी सासवड गोळीबारातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

दि. १८/०७/२०२४ रोजी दुपारी ०३.१५ वा. ये सुमारास जखमी नामे राहुल नामदेव टिळेकर वय ३८ वर्षे रा. सासवड ता. पुरंदर जि.पुणे याला त्याचे सासवड एसटी

स्टॅण्ड समोरील श्रीशाज आईसक्रीम पार्लर दुकानामध्ये ३ अज्ञात इसमांनी गोळीबार करून पोटात गोळी झाडून ठार करण्याचा प्रयत्न केला. सदर बाबत जखमी राहुल नामदेव टिळेकर याचा भाऊ विजय नामदेव टिळेकर याने दिलेल्या

7तकारीवरून सासवड पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता १०९ (१),३ (५),६१ (२) आर्म अॅक्ट ३(२५) प्रमाणे अज्ञात ३ इसम व प्रताप जगताप अजय जगताप, दयानंद जगताप यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गन्हयामध्ये आरोपी क. १) अजय संभाजी जगताप वय ४२ वर्षे रा. विठठल ढाब्याचे पाठीमागे जेजुरी ता. पुरंदर, जि.पुणे २) दयानंद संभाजी जगताप वय ३५ वर्षे रा. राजाराम निवास, शितोळे नगर, जुनी सांगवी, जि पुणे ३) प्रताप संभाजी जगताप वय ३८ वर्षे रा. मु.पो. मांडकी ता.पुरंदर जि.पुणे ४) सुजल तमन्ना आंबेघर वय २० वर्षे रा. चंदन नगर, खुळेवस्ती, लुंकड कॅम्प, गल्ली नं. ३ खराडी पुणे १४ ५) सुमित कमलाकर वाघमारे वय १९ वर्षे रा. अनिल होले यांचेकडे भाडयाने, युनियन बँक समोर, होलेवस्ती, उंड्री ता. हवेली जि.पुणे यांना अटक करण्यात आली होते. तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेण्यात आले होते.

गुन्हयातील अटक आरोपी नामे सुजल तमन्ना आंबेघर वय २० वर्षे रा. चंदन नगर, खुळेवस्ती, लुंकड कॅम्प, गल्ली नं. ३ खराडी पुणे १४ याचेकडे गुन्हयात वापरलेले २ पिस्तुल ०५ जिवंत काढतुस व १ पुंगळी असा १,०२,५००/- रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला होता.

गुन्हयातील आरोपी १) परमा माने रा. उंड्री, २) कुणाल लोणकर रा. कोंढवा, ३) अयज भोयावार रा. पुणेकरवस्ती उंड्री हे गुन्हा घडले पासुन फरार होते.

दि. ०६/०१/२०२५ रोजी यातील आरोपी नामे परशुराम उर्फ परमा कामन्ना माने हा छत्तीसगड येथुन उंड्री पुणे येथे आल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना मिळाली. त्यांनी लागलीच सासवड पोलीस स्टेशनकडील डी.बी पथकाचे पोलीस हवालदार सुरज नांगरे, पोलीस हवालदार लियाकतअली मुजावर पोलीस नाईक गणेश पोटे यांना साध्या वेशामध्ये पुणे उंड्री येथे रवाना केले. सदर अंमलदारांनी गोपनीय बातमीदाराचे मदतीने हांडेवाडी चौकामध्ये सापळा रचुन फरारी आरोपी परशुराम उर्फ परमा कामन्ना माने याला ताब्यात घेवनु अटक केली आहे. आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड सुनावली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरज नांगरे लियाकतअली मुजावर, पोलीस नाईक गणेश पोटे यांचे पथकाने केली आहे.


Translate »
error: Content is protected !!