माहूर व संपूर्ण काळदरीच्या खोऱ्याला वरदान ठरणारे माहूर धरण ओव्हर फ्लो माहूरजाई पाणी वाटप संस्थेच्या वतीने माहूर जाईच साडीचोळी वाहून जलपूजन मोठ्या उत्साहात
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
माहूर व संपूर्ण काळदरीच्या खोऱ्याला वरदान ठरणारे माहूर धरण पावसाच्या सतत धारेनंतर पूर्ण क्षमतेने भरून वाहू
लागले, यावेळी माहूर ग्रामस्थांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे, 1972 दुष्काळात बांधलेले धरण आज
माहूरची जलवाहिनी म्हणून ओळखली जाते, या धरणावर महाराष्ट्रातून अनेक पुरस्कार मिळवलेली प्रतिष्ठित माहूरजाई
पाणी वाटप संस्था या संस्थेच्या माध्यमातून योग्य प्रकारे पाण्याचे नियोजन केले जाते, आठ माही धरण चालणारे
त्याचं नियोजन बारा महिन्याच्या कॅलेंडर वर्षाप्रमाणे केलं जात, संपूर्ण परिसरा मधून जवळजवळ 22 ते 25 हजार
टन ऊस सोमेश्वर साखर कारखान्याला पाठवला जातो 700 ते 800 हॉर्स पॉवर च्या मोटारीने ही योजना चालते
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर माहूरजाई पाणी वाटप संस्थेच्या वतीने काळदरी खोऱ्यातील अनेक गावांना मोफत
पाणीपुरवठा केला जातो, ही योजना राष्ट्रातील आदर्शवत संस्था आहे असे माजी जिल्हा परिषद सदस्य बबूसाहेब माहुरकर, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शरद जगताप यांनी सांगितले.
आज पूर्ण क्षमतेने धरण वाहू लागल्यानंतर माहूरजाई पाणी वाटप संस्था समस्त ग्रामस्थ माहूर माहूर जाई ला साडी चोळी विधिवत पूजा करून जलपूजन करण्यात आले
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बबू साहेब माहुरकर, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप, प्रा राम जगताप, सत्यवान गोळे, पिंकू माहुरकर, तुकाराम
जगताप, रवींद्र जगताप, महादेव जगताप, अमोल गोळे, आत्माराम गोळे, बाळासो जगताप, धनाजी जगताप पुजारी शिवकुमार गुरव यावेळी उपस्थित होते






