पुणे

पुरंदर तालुक्यातील सासवडच्या स्मशानभूमीच्या छताची दुरावस्था


सासवड प्रतिनिधी बापू मुळीक:;

पुरंदर तालुक्यातील सासवडच्या स्मशानभूमीची छताची दुरावस्था

सासवड प्रतिनिधी: सासवड शहरातील लोकसंख्या सतत वाढत असतानाही, येथील वैकुंट स्मशानभूमीच्या दुरावस्तीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. स्मशानभूमीच्या छतावरील जीणॅ झालेला लोखंडी पत्रा बदलण्याबाबत अनेक दिवसांपासून नागरिक आणि माजी पदाधिकाऱ्यांनी मागणी केली असता, तरी अद्याप पर्यंत त्यावर काही कार्यवाही झाली नाही.

स्मशानभूमीवरील मुख्य शेडचा लोखंडी पत्रा ,पूर्णपणे गंजून गेलेला आहे, सर्व बाजूंनी तो खराब झाला आहे. यामुळे पावसाळ्यात अडचणी निर्माण होण्याची तर शक्यता जास्तच आहे. याबरोबरच लाखो रुपये खर्चून, उभारलेला गॅस दाहिनी केवळ कोरोना काळातच वापरली गेली आणि ती आता सुद्धा वापरता आली नाही,

प्रदूषण वाढ आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी गॅस दायनीच्या वापराबाबत पालिकेने जनजागृती करणे आवश्यक असल्याचे, जागरूक नागरिकांचे मत आहे. पाण्याच्या साठवण टाकीची गरज अंत्यविधी दरम्यान, नागरिकांनी स्नानासाठी पाण्याची आवश्यकता असते, मात्र स्मशानभूमीत पाण्याची टाकी नाही, येथे कुपनलिका असून,

पाणी चांगले असले, तरी दुःखद प्रसंगी हाताने हापसून पाणी काढावे लागते, त्यामुळे येथे टाकी बसवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील वढणे व डॉ. उदय कुमार जगताप यांनी केली आहे. सासवड येथील वैकुंठ स्मशानभूमीवरील, पत्रे खराब झाले आहेत ,ते बदलण्यासाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली असून, आठवडाभराने काम सुरू होणार आहे. जावेद मुल्ला, अभियंता सासवड नगरपरिषद.


Translate »
error: Content is protected !!